Monday, November 14, 2022

बचत पाण्याची, बचत जीवनाची 💗






आजकालच्या धावपळीच्या जीवनात सर्व काही गोष्टी वेगाने बदलत आहेत.🏃

ज्याप्रकारे जीवनशैली बदलत आहे, त्याचप्रमाणे निसर्गातही बदल आजकाल स्पष्ट दिसत आहे. त्याच निसर्गाचा अविभाज्य घटक आहे “पाणी”!🌊

सर्वांनाच माहित आहे की पाण्यालाच "जीवन" असे संबोधले जाते, 

आता असे का म्हणतात? ते वेगळं सांगायला नको…! 

माणसाला जीवन हे एकदाच मिळतं असं सर्वांचचं मत आहे आणि यात कुठलीही शंकाच नाही. परंतु एकपेक्षा जास्त जीवन मिळाले तर तो त्याचा दुरुपोग करतो, व्हिडिओ गेम याच उत्तम उदाहरण आहे.🎮

तसेच पाणी हे जीवन आहे आणि ते मुबलक प्रमाणात आपल्याला मिळत आहे. साहजिकच आहे त्यामुळे त्याचा दुरुपयोग तर होणारच आहे, यालाच आपण पाण्याचे प्रदूषण देखील म्हणू शकतो. 😨

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे, हे कानीकपाळी ओरडून सांगितले जात असले, तरी अजूनही पाण्याचे महत्त्व आपल्या लक्षात आलेले नाही. घरात २४ तास पाणी आहे, म्हणून पाणी भसाभस वापरले जाते. पण, एक दिवस नळाचे पाणी गेले, तरी तोंडचे पाणी पळते.



*click on image to know more

साधारणपणे एक व्यक्ती दिवसाला सुमारे १३५-१५० लिटर पाणी दररोज वापरतो. हा वापर झाला, पण किती वाया  घालवतो याचा अंदाज लावणे कठीणच आहे, पण तितकेच सोप्पे देखील आहे. 

ते कसे?  जाणून घेऊयात, 

आपल्या वागण्यातून आपल्याला नेहमी कळतं असते, पण आपण धावत्या जगात मागे पडू नये म्हणून या गोष्टींकडे कायम दुर्लक्ष करत असतो. 

१. जसे की ब्रश करताना आपण वेगळ्या-वेगळ्या विचारात नळ चालू ठेवून मस्त आपल्या विचारात रमून जाणे. 👈

२. अनावश्यक पाण्याचा साठा करून ठेवणे आणि दुसऱ्या दिवशी ताजे पाणी साठवण्यासाठी साठवलेले पाणी        ओतून देणे.👈

३. भांडी व कपडे स्वच्छ करण्यासाठी कायम नळ चालू ठेवणे.👈

४. आराम मिळण्यासाठी तासंतास शॉवर खाली उभे राहणे.👈

५. जर बारकाईने विचार केला तर कधी कधी गरम पाणी करण्याआधी त्यामध्ये  असणारे थंड पाणी ओतून  गरजेपेक्षा जास्त गरम पाणी घेणे आणि परत जास्त गरम असल्यामुळे त्यात थंड पाणी घेणे त्यासाठी आपण गरम पाणी ओतून देत असतो.👈

अश्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या आपल्याला माहिती सुद्धा आहेत की ज्याने पाण्याचे प्रदूषण होईल, पाण्याचा अतिअनावश्यक वापर होईल.

गोष्टी लहान आहेत पण विचार करण्यासारख्या आहेत. 

यामुळे पाणी ही वाया जाते आणि त्याला गरम करण्यासाठी लागणारी ऊर्जा ही वाया जाते! 

नुकसान आपलेच आहे, पण आपणच दुर्लक्ष करतो.😲

हीच खरी वेळ आहे सावध होण्याची कारण पाण्याचा बेसुमार वापर येणाऱ्या काळात अत्यंत धोकादायक ठरू शकेल..

आता वापरायला पाणी मिळत आहे येणाऱ्या काळात पाणी पिण्यासाठीही मिळेल की नाही हे सांगता येत नाही.

आता हे सर्व टाळायचे असेल आपल्या जीवन सोबत पाण्याच्याही जीवनाबद्दल विचार करा योग्य वेळी नळ बंद करा आवश्यक तितकेच पाणी वापरा, पाण्याचा अपव्यय टाळा. 

स्वच्छतेसाठी इतर मार्गांचा मधून अधून वापर करावा. शारीरिक आराम किंवा इतर गोष्टींसाठी मर्यादित पाण्याचा वापर करा. आवश्यक तितकेच गरम पाणी करा.  

बचत पाण्याची, बचत जीवनाची 💗



click on image know more


No comments:

Post a Comment

बचत पाण्याची, बचत जीवनाची 💗

आजकालच्या धावपळीच्या जीवनात सर्व काही गोष्टी वेगाने बदलत आहेत.🏃 ज्याप्रकारे जीवनशैली बदलत आहे, त्याचप्रमाणे निसर्गातही बदल आजकाल स्पष्ट दिस...